Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Marathwada Marathwada
Marathwada Marathwada
  • Home
  • Jalna
  • Sambhajinagar
  • pune
  • parbhani
  • Home
  • Jalna
  • Sambhajinagar
  • pune
  • parbhani
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Nashik

शिवराज्याभिषेक दिन स्वाभिमानाचा,शैर्याचा आणि सुसंस्कृतीचे जतन करणारा – दुर्गेश कठोठीवाले

By badaltamarathwada
June 6, 2026 1 Min Read
0

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिवस ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयात साजरा करण्यात आला.

प्रारंभी ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगांवकर व शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक,जालना  व म.न.पा. पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत समिती सदस्य दुर्गेश कठोठीवाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी ,ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष रमेश देहडकर,साप्ताहिक स्वप्नभूमी चे संपादक मिलिंद सावंत व नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक माधव ढाकणे,शाहीर बाबु सेवा राठोड याची उपस्थिती होती.

मनोगत व्यक्त करताना दुर्गेश कठोठीवाले म्हणाले कि, ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा फक्त शिवराज्यभिषेक दिन नसून स्वाभिमानाचा,शैर्याचा आणि सुसंस्कृतीचे जतन करणारा  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवराज्याभिषेका नंतर शिवाजी महाराजांना छत्रपती  ही पदवी बहाल झाली. शिवाजी महाराजांनी परकीयां सोबत गणिमीकावा असो किंवा समोरा-समोर युद्ध करून हिंदू धर्म टिकवण्याचे महान कार्य केले.

मनोगत व्यक्त करताना माधव ढाकणे म्हणाले कि, जगातले सर्व इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्द नितिचा अभ्यास करतात. हिंदवी स्वराज्यचा राजा घोषित करण्यसाठी  छत्रपती शिवाजी महाराजांचा  शिवराज्यभिषेक सोहळा करण्यात आला.

 मिलिंद सावंत यांनी देखिल मनागत व्यक्त केले. शाहिर बाबु सेवा राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुंदर पोवाडा सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितीचे आभार शैलेंद्र बदनापुरकर यांनी मानले. सुधाकर भालेराव,पांडूरंग काळे,कैलासचंद्र सराफ,बद्रीप्रसाद सोनी,वैभव गरदास,विजय खिल्लारे,सोपान सरनाईक, संजय शिमरे, कुणाल सेवलीकार,अभिजिता शेंडगे,रेणुका गुलापेल्ली यासह वाचक वर्ग उपस्थित होता.

Author

badaltamarathwada

Follow Me
Other Articles
Previous

जालना शहरातील सर्व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी यांच्या साठी महानगरपालिकेने स्कूल बस सेवा सुरु करा – सुशील वाघमारे

Next

भदंत महास्थविर चंद्रमणी : विस्मृतीत गेलेल्या एका दीपस्तंभाची स्मृती

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • YouTube
Copyright 2026 — Marathwada. All rights reserved. Blogsy WordPress Theme