प्रतीक्षा संपली : जाफराबाद आगारात चार नव्या ई-बसेस दाखल
प्रदूषणमुक्त आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा; लवकरच होणार लोकार्पण
आरदखेडा प्रतिनिधी शेख अल्ताफ
जाफराबाद बस आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी चार नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) दाखल झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आगारात ई-बसेससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होते. हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर आता या बसेस आगारात उपलब्ध झाल्या असून, जाफराबाद आगाराने पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
इंधन बचत आणि आरामदायी प्रवास
डिझेलवरील एसटी बसेसला ई-बसेस हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. या बसेसमुळे महामंडळाच्या
जाफराबाद आगारात नव्याने दाखल झालेल्या ई-बसेस आणि पाठीमागे उभारण्यात आलेले चार्जिंग स्टेशन.
इंधनावरील खर्चात मोठी बचत होईल, तसेच प्रवाशांना वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभमिळेल, अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. ई-बसेस पूर्णपणे आवाजविरहित असल्याने आणि त्यामध्ये आरामदायी
आसनव्यवस्था असल्याने नियमित प्रवास करणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या नव्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या नवीन ई-बसेसचे रीतसर उद्घाटन लवकरच पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या हस्ते
प्रवाशांमध्ये उत्साह
रोज जालन्याला ये-जा करणारा विद्यार्थी अक्षय पवार याने सांगितले की, उन्हाळ्यात लाल डब्यात घामाच्या नद्या वाहायच्या. आता ई-बसच्या एसीत बसून शिमला फिरल्यासारखे वाटेल. तर एका आजीबाईंनी या बसला आवाज नसल्याने प्रवासात शांत झोप लागेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
सेवेचा लाभ मिळणार आहे.
जाफराबाद झाले स्मार्ट
बैलगाडीपासून एसटीच्या लाल डब्यापर्यंतचा प्रवास पाहिलेल्या जाफराबादने आता थेट इलेक्ट्रिक युगात उडी घेतली आहे. चार्जिंग पॉईंटचे निळे खांब आता आगाराची नवी ओळख बनले आहेत.
केले जाणार आहे. उद्घाटनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बसेस प्रामुख्याने जाफराबाद-जालना आणि जाफराबाद-छत्रपती संभाजीनगर या मागाँवर प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. या सुविधेमुळे आता ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्याधुनिक बस